'इंडियन आयडॉल' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिऍलिटी शोपैकी एक आहे. या शोचा 12 वा सीजन प्रचंड गाजला होता.
'इंडियन आयडॉल 12'मध्ये पवनदीप राजन, सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, अरुणिता कांजीलाल,सवाई भट्ट, नचिकेत लेले,अंजली गायकवाड, आणि मोहम्मद दानिश यांसारखे एकापेक्षा एक दमदार स्पर्धक सहभागी झाले होते.
यामधील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आणि फायनल पर्यंत पोहोचलेल्या काही मोजक्या स्पर्धकांमध्ये मोहम्मद दानिशचा समावेश होतो. दानिशचा मोठा चाहतावर्ग आहे.
गायकाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. दानिश लग्न बंधनात अडकणार आहे. त्याच्या हळदी आणि मेहंदीचे कार्यक्रम नुकतेच पार पडले.
दानिश कोणासोबत लग्न करत आहे? किंवा त्याची गर्लफ्रेंड कोण आहे? याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाहीय.