लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत 'ही' Heroin अव्वल, पाहा तुमची आवडती अभिनेत्री कोणत्या स्थानावर?
सध्या मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. तसेच या मालिकेमधील अभिनेत्रींनासुद्धा अफाट लोकप्रियता मिळत आहे. या महिन्यात कोणत्या अभिनेत्री लोकप्रियतेच्या यादीत टॉप 5 मध्ये आहेत पाहूया..
|
1/ 6
सध्या मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. तसेच या मालिकेमधील अभिनेत्रींनासुद्धा अफाट लोकप्रियता मिळत आहे. या महिन्यात कोणत्या अभिनेत्री लोकप्रियतेच्या यादीत टॉप 5 मध्ये आहेत पाहूया.. ही यादी प्रेक्षकांच्या मतानुसार ठरवण्यात आली आहे.
2/ 6
हृता दुर्गुळे- सध्या झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत हृता दिसून येत आहे. या मालिकेमुळे ती प्रचंड प्रसिद्धी मिळवत आहे. या महिन्यात हृता मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
3/ 6
प्रार्थना बेहेरे- 'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहेरे झळकत आहे. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडत आहे. नेहा म्हणजेच प्रार्थना या महिन्यात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4/ 6
ज्ञानदा रामतीर्थकर- 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेत अप्पू साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा फारच लोकप्रिय झाली आहे. या महिन्यात ती तिसऱ्या क्रमांकावर आहे.
5/ 6
पूजा बिरारी- 'स्टार प्रवाह वाहिनीवरील 'स्वाभिमान' या मालिकेत पूजा बिरारी काम करत आहे. ती लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
6/ 6
गिरीजा प्रभू- 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका प्रचंड पसंत केली जाते. मालिकेतील साधी भोळी गौरी प्रेक्षकांना फारच पसंत पडते. ही भूमिका अभिनेत्री गिरीजा प्रभूने साकारली आहे. ती सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.