'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून राणा-अंजली अर्थातच हार्दिक जोशी-अक्षया देवधर घराघरात पोहोचले होते.
या दोघांची जोडी इतकी लोकप्रिय झाली होती की, त्यांनी खऱ्या आयुष्यातसुद्धा एकत्र यावं असं चाहत्यांना वाटतं होतं.
आणि अगदी असंच घडलं, हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.