बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सतत चित्रपट, जाहिराती किंवा रिऍलिटी शोमध्ये व्यग्र असते. ही अभिनेत्री सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधत असते. आज ही अभिनेत्री आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल थोडं जाणून घेऊया.
सनी लियोनीचा जन्म 13 मे 1981मध्ये झाला होता. तिचं खरं नाव करणजीत कौर वोहरा असं आहे. परंतु मनोरंजन सृष्टीत ती सनी लियोनी या नावाने ओळखली जाते.
'जिस्म 2' मधून बॉलिवूड एन्ट्री करणाऱ्या सनी लियोनीकडे अफाट संपत्ती आहे. अभिनेत्री मुंबईमध्ये आपल्या पती आणि मुलांसोबत राहते.
लॉस अँजेलिसमध्ये सनीचं आलिशान घर आहे. या घराचं नाव ड्रीम असं आहे. त्याची किंमत तब्बल 19 कोटी असल्याचं म्हटलं जातं.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीकडे ऑडी, मेसराटी, बीएमडब्ल्यू, क्वार्ट्रोपोर्ट अशा महागड्या कार आहेत.
रिपोर्टनुसार, सनी लियोनीकडे एकूण 13 मिलियन डॉलरची संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. भारतीय भाषेत अभिनेत्रीकडे तब्बल 98 कोटींची संपत्ती आहे.