आपल्या सुमधुर आवाजाने श्रेया घोषालने लोकांना मंत्रमुग्ध केलं आहे. अभिनेत्री आपल्या गाण्यांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते.
श्रेया घोषालच्या लव्ह लाईफबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. कित्येकांना हा प्रश्न पडतो की, टॉपची गायिका असूनदेखील श्रेयाने एखाद्या गायकासोबत लग्न का नाही केलं?
तब्बल 10 वर्षांच्या डेटिंगनंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. शिलादित्य एक इंजिनिअर आहे. या जोडप्याला एक गोंडस मुलगाही आहे.
श्रेया घोषालने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'मी जर एखाद्या गायकासोबत लग्न केलं असतं, तर मला व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात त्याच-त्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या असत्या.
आयुष्यात काहीतरी बदल हवा होता. दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न केल्याने निदान इतर विषय समजून घ्यायला मिळतात. कंटाळा येत नाही.