'लागीर झालं जी' मालिकेतून शीतली सर्वांच्या भेटीला आली होती. अभिनेत्री शिवानी बावकरने ही भूमिका साकारली होती.
या मालिकेमुळे शिवानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आज शिवानी बावकर आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीबाबत एक खास गोष्ट जाणून घेऊया.
त्याचप्रमाणे सध्या टीव्हीवर 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही नेहमीच अव्वल असते.
मालिकेतील मुख्य नायिका अरुंधती अर्थातच अभिनेत्री मधुरानी प्रभुलकर होय. मधुरानीलाही अफाट लोकप्रियता मिळाली आहे.
शिवानी ही मधुरानीची विद्यार्थिनी आहे. वाटलं ना आश्चर्य? हे खरं आहे. मधुरानी प्रभुलकर आणि त्यांचे पती एकत्र एक अभिनय क्लास चालवतात.
याच क्लासमध्ये शिवानीने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. इतकंच नव्हे तर हृता दुर्गुळेसुद्धा मधुरानीचीच विद्यार्थीनी आहे.