बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण अभिनेत्री शमिता शेट्टी नेहमीच आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
शमिता शेट्टी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.यानिमित्ताने तिच्या आयुष्यातील काही न ऐकलेले गोष्टींवर एक नजर टाकूया.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपला संसार थाटला आहे.ती आपल्या पती आणि मुलांसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.
मात्र सर्वांनाच हा प्रश्न पडतो की,शमिताने अजूनही लग्न का केलेलं नाहीय?परंतु यामागे एक मोठं कारण आहे.
शमिताने यावेळी नेहा भसीनसोबत बोलताना सांगितलं होतं की, तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता.
शमिता शेट्टीच नाव राकेश बापट,उदय चोप्रा, युवराज सिग, हरमन बवेजा आशा अनेक सेलिब्रेटींसोबत जोडण्यात आलं आहे.