साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून समंथा प्रभूला ओळखलं जातं. समंथाने जगभरात आपली खास ओळख निर्माण केली आहे.आज अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे.
मात्र फारच कमी लोकांनां माहिती असेल की, समंथा नागासोबत लग्न करण्यापूर्वी साऊथ स्टार सिद्धार्थच्या प्रेमात पडली होती.
सिद्धार्थसुद्धा श्रुती हसनसोबत ब्रेकअपने खचला होता. तोसुद्धा समंथाला पसंत करत होता. या दोघांचं नातं इतक्या पुढे गेलं होतं की, दोघेही लिव्ह इनमध्ये राहात होते.
समंथाला लग्न करायचं होतं मात्र सिद्धार्थ यासाठी तयार नव्हता. रिपोर्ट्स समंथासोबत रिलेशनशिपमध्ये असताना इतरसुद्धा मुलींना डेट करत होता.