मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगेने शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' मध्ये प्रीती सभरवालची दमदार भूमिका साकारत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. आज अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे.
8 जानेवारी 1986 मध्ये कोल्हापुरातील राजघराण्यात झाला होता. अभिनेत्री शाहू महाराजांच्या घराण्यातील लेक आहे. अभिनेत्री 'खतरों के खिलाडी' मध्येही झळकली होती. फारच कमी लोकांना माहिती आहे सागरिका एक नॅशनल लेव्हल हॉकी प्लेयरसुद्धा आहे.
कोल्हापुरातील राजे घराण्यात जन्माला आलेल्या सागरिकाची आजी सीता राजे घाटगे इंदौरचे राजे तुकोजीराव होळकर यांची मुलगी होती.
सागरीकाचे वडील विजय घाटगे यांचं स्वतः मनोरंजनसृष्टीशी नातं होतं.सागरिका शिक्षण घेत असतानाच तिला जाहिरातींमध्ये काम करण्याची ऑफर मिळत होती
सागरिका घाटगेने माजी क्रिकेटर जहीर खानसोबत लग्न केलं आहे. परंतु हे दोघांसाठी सोपं नव्हतं. यामध्ये त्यांना फारच समजूतदारपणे पाऊले उचलावी लागली होती.
परंतु जहीर खानच्या कुटुंबाने आधी 'चक दे इंडिया' हा चित्रपट पाहिला आणि नंतर त्यांनी लग्नाला होकार दिला होता.सागरिकाला एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आलं होतं, तुला तुझ्या नवऱ्याच्या जागी कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल.
या प्रश्नाचं उत्तर देत सागरिका घाटगेनं अभिनेता रणबीर कपूरला जहीर खानच्या भूमिकेत पाहायला आवडेल असं म्हटलं होतं. सागरिका घाटगेने हिंदी, मराठी आणि पंजाबी चित्रपटांत काम केलं आहे. तिने मोजक्याच चित्रपटात काम केलं आहे.