बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने अभिनयाच्या जोरावर आपली एक खास ओळख बनवली आहे. अभिनेत्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारत आपलं कलाकौशल्य सिद्ध केलं आहे. आज अभिनेता आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्याच्या खाजगी आयुष्याबाबत काही गोष्टी जाणून घेऊया.
रणदीप हुड्डाचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला होता. अभिनेत्याचे वडील एक सर्जन आणि आई सामाजिक कार्यकर्त्या आहेत. रणदीपला एक भाऊ आहे जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि एक बहीण आहे जी तिच्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर आहे. अशा परिस्थितीत आपला मुलगादेखील डॉक्टर व्हावा असं त्याच्या वडिलांचं मत होतं.
रणदीपने मेलबर्न, ऑस्ट्रेलियामधून आपलं उच्च शिक्षण आहे. ऑस्ट्रेलियातून त्याने मार्केटिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. एका मुलाखतीत रणदीपने सांगितलं होतं की, ऑस्ट्रेलियात शिकत असताना त्याने टॅक्सी चालवली, गाड्या साफ केल्या आणि रेस्टॉरंटमध्येही काम केलं. कारण घरातून मिळणारे पैसे खर्चासाठी पुरेसे नव्हते.
आज अभिनेत्याकडे गडगंज पैसा आणि लग्झरी लाईफस्टाईल आहे. त्याने सिनेसृष्टीतून अफाट संपत्ती कमावली आहे.
रणदीपने 'मान्सून वेडिंग' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज अभिनेता चित्रपटासाठी तब्बल 2 कोटी रुपये इतकं मानधन घेतो.
अभिनेता महिन्याला जवळजवळ 50 लाख रुपये कमावतो. त्याची एकूण संपत्ती 10 मिलियन डॉलर अर्थातच भारतीय भाषेत 80 कोटींची संपत्ती आहे. हा 2021 चा रिपोर्ट आहे. यामध्ये आणखी वाढ झालेली शंका नाही.
अभिनेत्याच्या करिअरच्या सुरुवातीपासून त्याचं नाव अभिनेत्री सुष्मिता सेन जोडलं जात होतं. परंतु रणदीप सध्या लिन लॅशरॅमला डेट करत आहे.