बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव यांना आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आपल्या प्रत्येक भूमिकेतून त्यांनी लोकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं आहे.
विनोदी अभिनेता अशी ओळख असली तरी राजपाल यादव यांनी प्रत्येक पद्धतीच्या भूमिका साकारत आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. हा अभिनेता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
राजपाल यादव यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील कुंद्रा याठिकाणी झाला होता. एका छोट्याश्या गावातून येत त्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान बनवलं आहे.
या अभिनेत्याने सर्वप्रथम दूरदर्शनवरील एका मालिकेत काम केलं होतं. त्यांनतर त्यांनी सिनेमांमध्ये एन्ट्री घेतली होती.
खाजगी आयुष्याबाबत सांगायचं तर त्यांनी फारच दुःख पाहिलं आहे. अभिनेत्याचं पहिलं लग्न करुणासोबत झालं होतं. मात्र लेकीला जन्म दिल्यानंतर प्रेग्नसीमधील कॉम्प्लिकेशन्समुळे त्यांचं निधन झालं. यावेळी राजपाल यादव पूर्णपणर तुटून गेले होते.
पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांना लग्न करण्याची इच्छा नव्हती. मात्र २००३ मध्ये ते कॅनडा मध्ये राधा नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडले. त्यांनंतर राजपाल यादवने दुसरं लग्न केलं होतं.