बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड स्टार्सपासून ते चाहत्यांकडून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अभिनेत्यासाठी यंदाचा वाढदिवस खूप खास आहे. कारण पत्नी पत्रलेखासोबत लग्नानंतरचा हा त्याचा पहिला वाढदिवस आहे. परंतु आज आपण अभिनेत्याच्या लव्ह स्टोरीबाबत नव्हे तर नेटवर्थबाबत जाणून घेणार आहोत.
राजकुमार रावचा जन्म 31ऑगस्ट 1984 मध्ये अहिरवाल, गुडगाव येथे झाला आहे. अभिनेत्याने दिल्ली विद्यापीठाच्या आत्माराम सनातन धर्म महाविद्यालयातून पदवी घेतली आहे.
तसेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेततूनही शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर राजकुमारने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली होती. राजकुमार रावला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक 2010 मध्ये 'रण' चित्रपटातून मिळाला होता.
आज अभिनेता बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या राजकुमार आपल्या एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये मानधन घेतो.
राजकुमारजवळ जबरदस्त क्लास कलेक्शन आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये 70 लाखांची ऑडी, 30 ते 40 लाखांची मर्सिडीज, 19 लाखांची हार्डली डेव्हिडसन्सची बाईकचा समावेश आहे.
राजकुमार रावच्या एकूण संपत्तीबाबत सांगायचं झालं तर, 2021 च्या एका रिपोर्टनुसार, अभिनेता 6 मिलियन म्हणजेच भारतीय भाषेत सांगायचं तर तब्बल 44 कोटी रुपयांचा मालक आहे.