मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं. प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे. आज अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे.
प्रियाच्या व्यावसायिक आयुष्याबाबत तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु अभिनेत्रींच्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळेच आज आपण प्रिया आणि उमेशची हटके लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.
'भेट' या चित्रपट या दोघांनी एकत्र काम केलं होतं. परंतु या दोघांचा एकत्र एकही सीन चित्रपटात नव्हता. मात्र चित्रपटाच्या प्रीमियरवेळी दोघांची पहिली भेट घडून अली होती.परंतु फारसं बोलणं झालं नाही.
त्यानंतर त्यांनी 'आभाळमाया' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तरीसुद्धा त्यांच्यात फारसं बॉन्डिंग झालं नव्हतं. मात्र या दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले होते. त्यांच्या 'वादळवाट' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली ओळख झाली.
2006 मध्ये म्हणजेच भेटीच्या तब्बल 3 वर्षानंतर प्रिया बापटने स्वतः उमेशला लग्नाची मागणी घातली होती. उमेशसुद्धा प्रियावर प्रेम करत होता. परंतु होकार देण्यासाठी त्याने जवळजवळ एक महिना प्रियाला वाट पाहायला लावलं होतं.
उमेशने प्रियाच्या वाढदिवसाला सरप्राईज देत लग्नासाठी होकार दिला होता. तब्बल 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
परंतु या लग्नासाठी त्यांना फार प्रतीक्षा करावी लागली होती. कारण उमेश त्यावेळी इंडस्ट्रीत तितकासा स्थिर झालेला नव्हता त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी प्रियाच्या घरातून विरोध होता. आणि कुटुंबाच्या विरोधात काही करायचं नाही असं त्यांचं ठरलं होतं. त्यामुळे त्यांचा होकार मिळवण्यासाठी त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली होती.
शिवाय प्रिया आणि उमेशच्या वयातसुद्धा मोठा अंतर आहे. मात्र नंतर प्रियाच्या कुटुंबाने होकार दिला आणि या दोघांनी लग्न केलं.