90 च्या काळातील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रीती झिंटा होय. प्रीती आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीच्या आयुष्यातील एका रंजक गोष्टीबाबत जाणून घेऊया
प्रीती झिंटाने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत. आणि या चित्रपटांमधून प्रीतीला अफाट लोकप्रियता मिळाली आहे.
प्रीती झिंटाने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आहेत. आणि या चित्रपटांमधून प्रीतीला अफाट लोकप्रियता मिळाली आहे.
परंतु एका चित्रपटाच्या शूटिंगनंतर असं काही घडलं की, प्रीतीला धक्का बसला होता. आणि त्यांनतर अभिनेत्रीने जे पाऊल उचललं ते पाहून सर्वच चकित झाले होते.
प्रीती झिंटाने अब्बास मस्तान दिग्दर्शित 'चोरी चोरी चुपके चुपके' या गाजलेल्या सिनेमात काम केलं होतं. या चित्रपटात प्रीतीसोबत राणी मुखर्जी आणि सलमान खानदेखील होते.
परंतु चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या कलाकारांना समजलं की या सिनेमात अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा पैसा लागला आहे.
यावेळी प्रितीने कोणालाही जमणार नाही असं करुन दाखवलं होतं. अभिनेत्रीने छोटा शकीलविरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती.प्रीतीने आपल्याला अनेक धमकीचे कॉल येत असल्याचंही याकाळात सांगितलं होतं.
प्रीतीने दाखवलेल्या धाडसाचं नंतर सर्वत्र कौतुक झालं होतं. सध्या आपल्या विदेशी पतीसोबत अभिनेत्री विदेशात राहते.