बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीय. अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण असूनदेखील परिणीतीने स्वतः च्या अभिनय कौशल्यावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. आज ही अभिनेत्री आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तिच्या खाजगी आयुष्यावर एक नजर टाकूया.
परिणीती चोप्राचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 मध्ये हरियाणातील अंबाला येथे झाला होता. पंजाबी-हिंदू कुटुंबात जन्मलेल्या परिणीतीचे वडील एक व्यापारी आहेत आणि तिची आई एक गृहिणी आहे. परिणीतीला दोन भाऊदेखील आहेत. तरप्रियांका चोप्रा ही तिच्या मोठ्या काकांची मुलगी आहे.
परिणीतीचं सुरुवातीचं म्हणजेच शालेय शिक्षण अंबाला येथेच झालं आहे. परिणीती पहिल्यापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार होती. तिची जिद्द पाहून वडिलांनी तिला वयाच्या 17 व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं होतं.
अभिनेत्रीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. परिणीतीने बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्स केलं. परिणीतीचं स्वप्न इन्व्हेस्टमेंट बँकर बनण्याचं होतं. पण 2009 मध्ये तिला सुट्टीमुळे भारतात परत यावं लागलं आणि ती मुंबईत आली. मुंबईत ते यशराज फिल्म्समध्ये मार्केटिंग विभागात रुजू झाली होती.
मार्केटिंग विभागात काम करत असताना परिणीती प्रचंड सक्रिय होती. त्यामुळे ती पटकन सर्वांच्या नजरेत आली. त्यावेळी आदित्य चोप्राला परिणीतीमध्ये अभिनय कौशल्य असल्याचं दिसून आलं. आणि त्यामुळे त्यांनी परिणीतीकडून तब्बल 3 चित्रपट साइन करून घेतले आणि परिणीती बॉलिवूडमध्ये आली.
अनेकांना परिणीतीच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तसेच अभिनेत्रीची नेटवर्थ किती आहे याबाबतही जाणून घ्यायचं आहे. आज आपण तेच पाहणार आहोत.
परिणीतीने जास्तीत जास्त संपत्ती चित्रपटांतुन मिळवली आहे. तसेच ती अनेक ब्रँडसाठी जाहिरातीदेखील करते. यामधूनसुद्धा तिला अफाट पैसे मिळतात. परिणीतीच्या घराची किंमत 22 कोटी असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.
तसेच अभिनेत्रीकडे जॅगुआर,ऑडी,मर्सिडीज अशा अनेक आलिशान कार आहेत. अभिनेत्री एका चित्रपटासाठी 5 कोटी रुपये मानधन घेते. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 8 मिलियन डॉलर इतकी आहे.