पंजाबी गायक गुरु रंधावा आज तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. आपल्या आवाजाने त्याने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. आज हा गायक आपला वाढदिवस साजरा करत आहे.
गुरु रंधावाच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. परंतु त्याच्या खाजगी आयुष्याबाबत फारच लोकांना माहिती असेल. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याबाबत एक खास गोष्ट जाणून घेणार आहोत.
आज गुरु रंधावाने पंजाबी इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही आपला जम बसवला आहे. फक्त देशातच नव्हे तर जगभरात त्याचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.परंतु हा किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा गुरु स्टार नव्हे तर एक सामान्य मुलगा होता.
स्टार बनण्यापूर्वी गुरुला एक मुलगी पसंत पडली होती. त्याने त्या मुलीजवळ आपल्या प्रेमाचा खुलासा केला होता.इतकंच नव्हे तर त्याने त्या मुलीसाठी एक गाणंसुद्धा लिहलं होतं. '
परंतु गुरु लोकप्रिय नाही, त्याच्याजवळ तितका पैसा आणि प्रसिद्धी नाही, त्याच काहीच व्यक्तिमत्व नाही असं सांगत त्या मुलीने गुरुला नाकारलं होतं.त्यामुळे गुरुला प्रचंड वाईट वाटलं होतं.
पुढे त्या मुलीसाठी लिहलेलं गाणं गुरुने रिलीज केलं आणि ते सुपरडुपर हिट झालं. इतकंच नव्हे तर त्यामुळे गुरु रातोरात स्टार बनला होता. ते गाणं होतं 'बन जा तू मेरी राणी'.
गुरुला पैसा-प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती मुलगी त्याच्याजवळ परत आली होती. परंतु यावेळी मात्र गुरुने तिला नकार दिला होता.
काही दिवसांपूर्वी गुरुचं नाव मृणाल ठाकूरसोबत जोडलं जात होतं. त्यानंतर आता गुरु रंधावा नोरा फतेहीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.