बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून बिपाशा बसूला ओळखलं जातं. अभिनेत्री आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमिताने तिच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया.
बिपाशा बसू आपल्या काळातील एक आघाडीची नायिका म्हणून ओळखली जात होती. सध्या अभिनेत्री आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.
बिपाशा बसूच्या संपत्तीबाबत जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता आहे. अमर उजालाच्या वृत्तानुसार, बिपाशा बसू आपल्या पतीपेक्षा सातपट जास्त श्रीमंत आहे.
बिपाशा बसूने विविध ब्रँडच्या जाहिराती आणि चित्रपटांमधून ही संपत्ती कमावली आहे. आजही अभिनेत्री जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यावधींची कामे करत आहे.
बिपाशा बसूची एकूण संपत्ती तब्बल 111 कोटी इतकी आहे. तर करण सिंह ग्रोव्हरची संपत्ती 15 कोटींच्या आसपास आहे.