बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गायकांच्या यादीत अरिजीत सिंगचं नाव आवर्जून घेतलं जातं. अरिजीतने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी हिंदी सिनेसृष्टीला दिली आहेत. आज अरिजीत आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीचं एक दशक पूर्ण करणाऱ्या अरिजित सिंगने सर्वप्रथम एका सिंगिंग रिऍलिटी शोमधून लोकांची मनं जिंकली होती. 2005 मध्ये आलेल्या टीव्ही शो 'गुरुकुल' मधील टॉप 5 स्पर्धकांमध्ये त्याचा समावेश होता. यानंतर अरिजित सिंगने इंडियन आयडॉलमध्येही सहभाग घेतला. यशासाठी अरिजितला बराच काळ संघर्ष करावा लागला होता.गायकाचा जन्म 1987 मध्ये पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथे झाला होता.
बालपणापासूनच गायनाचं वेड असणाऱ्या अरिजीत सिंगल आपलं खाजगी आयुष्य लाइमलाईटपासून दूर ठेवायला आवडतं. त्यामुळे त्याचे चाहते सतत त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
अरिजीत सिंगच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर त्याची दोन लग्ने झाली आहेत. त्याची पहिली पत्नी रुपरेखा ही होय. अरिजीत तिला गुरुकुलच्या सेटवर भेटला होता. ती त्याची सह-स्पर्धक होती.
अरिजीत आणि रुपरेखा एकमेकांवर प्रेम करु लागले आणि त्यांनी गडबडीत लग्नसुद्धा उरकलं. परंतु त्यांचं लग्न फारकाळ टिकू शकलं नाही. त्यांनी लग्नाच्या वर्षभरातच घटस्फोट घेतला होता. हा काळ अरिजीतसाठी फारच दुःखद होता.
अरिजीत सिंगने रुपरेखासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आपली बालपणीची मैत्रीण कोयल रॉयसोबत लग्न केलं आहे. कोयलचंसुद्धा हे दुसरं लग्न आहे. गायकाने बरेच दिवस आपलं दुसरं लग्न लपवून ठेवलं होतं.
अरिजीत आणि कोयलला तीन मुले आहेत. यामध्ये दोन मुले अरिजीत आणि कोयलची आहेत. तर एक मुलगी कोयलच्या पहिल्या पतीची आहे.