अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 34वा वाढदिवस (Happy Birthday Anushka Sharma) साजरा करत आहे. अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव आज सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच Chakda Xpress या सिनेमात भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री बऱ्याच कालावधीनंतर या सिनेमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यामुळे तिचे चाहते या सिनेमासाठी अधिक उत्सुक आहेत.
अभिनेत्रीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत, काही चांगल्या प्रोजेक्ट्सची निर्मितीही तिने केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का तिने काही सुपरहिट ठरलेले चित्रपट रिजेक्टही केले आहेत. तिने रिजेक्ट केलेले चित्रपट त्यानंतर करीना कपूर खान, आलिया भट्ट, कतरिना कैफ, तमन्ना, दीपिका पादुकोण यांना ऑफर करण्यात आले आहे. यातील काही चित्रपट हिट देखील ठरले आहेत. बॉलिवूड लाइफने याविषयी वृत्त दिले आहे.
Ki & Ka या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर ऐवजी अनुष्काला ही कियाची भूमिका अर्जुन कपूरसह ऑफर करण्यात आली होती. पण तिने ही ऑफर रिजेक्ट केली
तमाशा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नसला तरी समीक्षकांनी आणि चाहत्यांनी या सिनेमाची प्रशंसा केली. दरम्यान यातील दीपिकाची भूमिका आधी अनुष्काला ऑफर करण्यात आली होती. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार 2 स्टेट्स या सिनेमातील आलिया भट्टने जी भूमिका साकारली आहे त्यासाठी आधी अनुष्का शर्मा ही मेकर्सची पसंत होती. पण अनुष्काने अर्जुन कपूरसहचा हा सिनेमा देखील रिजेक्ट केला होता.
कतरिना कैफ 'बार बार देखो' मध्ये मुख्य भूमिकेत आहे. तिच्याऐवजी ही भूमिका आधी अनुष्काला देण्यात आली होती.
3 Idiots या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर कमाल केली. या सिनेमाचा प्रेक्षकवर्ग आजही आहे. यामध्ये आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी आणि बोमन इराणी यांच्यासह करीना कपूर खान मुख्य आहे. ही भूमिका देखील अनुष्का शर्मा हिला ऑफर करण्यात आली आहे.
Aagadu या महेश बाबूच्या सिनेमात अनुष्का शर्माला भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण मीडिया रिपोर्टनुसार अनुष्का शर्माचे मानधन खूप होते, त्यामुळे ही भूमिका तमन्नाकडे गेली.