बॉलिवूड अभिनेता आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक बच्चन सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिषेक बच्चनचा जन्म ५फेब्रुवारी १९७६ मध्ये झाला होता. अभिषेक बच्चन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. तो सिनेमांसोबतच स्पोर्ट्समध्येसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. २०२० च्या मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता महिन्याला २ कोटींची कमाई करतो. अभिषेक बच्चन महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. अभिषेक बच्चनजवळ ऑडी, बीएमडब्लू, मर्सिडीज, मर्सिडीज बेन्जसारख्या अनेक लग्जरी कार आहेत. अभिषेक बच्चनजवळ एकूण २०३ कोटींची संपत्ती आहे.