रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या मराठमोळ्या जोडीने सध्या सर्वानांच वेड लावलं आहे. सर्वत्र या दोघांची जादू दिसून येत आहे.
रितेश आणि जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना भुरळ पाडायला यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये खेचण्यात यश मिळवलं आहे.
त्यामुळेच सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड नव्हे तर मराठी चित्रपटाची हवा दिसून येत आहे. वेड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे.
रितेश आणि जिनिलियाच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली होती. त्यांनंतर पुढे हा आकडा असाच वाढत गेला होता.
आज प्रदर्शनाच्या नवव्या दिवशीसुद्धा या चित्रपटाची जादू कायम आहे. ट्रेड रिपोर्टनुसार वेडने नवव्या दिवशी तब्बल 5 कोटींचा गल्ला जमवला आहे.
समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या 'मजिली' या साऊथ चित्रपटाचा रिमेक असूनदेखील हा चित्रपट तुफान हिट ठरत आहे.
जिनिलियाने तब्बल 10 वर्षांच्या विश्रांतीनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. अभिनेत्रीने कमबॅकसाठी मराठी सिनेमा निवडल्याने महाराष्ट्रातील तिचे चाहते प्रचंड आनंदी आहेत.