राज्यात सध्या गौतमी पाटील या नावाची जोरदार चर्चा आहे. तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांच्याच तोंडी हे नाव ऐकायला मिळत आहे.
गौतमी पाटीलने आपलं नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर सर्वांनाच वेड लावलं आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
एकीकडे असं असताना दुसरीकडे मात्र चित्र वेगळं आहे. गौतमी पाटीलवर टीका करणाऱ्यांचीदेखील संख्या वाढली आहे.
गौतमी ही मूळची जळगावमधील चोपडा जिल्ह्यातील वेळोदे गावची आहे. या गावकऱ्यांनी गौतमीला पाठिंबा देत आपण तिच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे.