भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वाधिक लोकाप्रिय ठरलेला शो 'शक्तीमान' पुन्हा एका डीडी नॅशनलवर प्रसारित होणार आहे. सुरवातीला 1997 ते 2005 मध्ये या शोचं प्रसारण झालं होतं. पण आता जवळपास 15 वर्षांनंतर या शोमधील कलाकार ओळखताही येणार नाहीत इतके बदलले आहेत.
शक्तीमानमध्ये गीता विश्वासची भूमिका साकारणारी अभिनेत्री वैष्णवी महंत आता 45 वर्षांची आहे. मात्र आता ती ओळखताही येत नाही एवढी बदलली आहे.
शक्तीमानमध्ये शोच्या हिरोसोबत सर्वाधिक मुलांच्या सर्वाधिक लक्षात राहिला तो या शोमधील व्हिलन. शो मधील व्हिलन म्हणजे तमराज किलविश अर्थात अभिनेता सुरेंद्र पाल आता असे दिसतात.
शक्तीमानमध्ये नौरंगी बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारे किशोर आनंद भानुशाली आता असे दिसतात. त्यांनी भाभी जी घर पर है या मालिकेतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
मेयर जेजेच्या भूमिकेत अभिनेता नवाब शाहनं मुलांना खूप घाबरवलं होतं. आज नवाब शाह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे.
काळी मांजर आणि शलाकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासकर त्यावेळी तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी ठरली होती.
लवकरच शक्तीमानचा सिक्वेल तयार करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाउननंतर यावर काम सुरू होऊ शकतं. त्यामुळे कदाचित मुलांना पुन्हा एकदा डॉ. जैकाल म्हणजे ललित सरिमू यांना पाहण्याची संधी मिळू शकते.
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन करण्यात आलं आणि त्यामुळेच रामायण, महाभारत या लोकप्रिय शोसोबतच आता शक्तीमान हा लोकप्रिय शोसुद्धा टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारिसत होत आहे. त्यावेळी सर्वांचा लाडका असलेला शक्तीमान म्हणजेच गंगाधर आता म्हातारा झाला आहे.