अनुष्का शर्मा मानसिक आरोग्याविषयी एकदा नाही तर अनेकदा बोलली आहे. 'मानसिक आरोग्याच्या समस्या कोणालाही लाजवण्यासारख्या नाहीत आणि त्याबद्दल लाज वाटण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे आपण कोणत्याही शारीरिक आजाराच्या वेळी आपल्या उपचारासाठी डॉक्टरांकडे जातो, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या डॉक्टरांना भेटले पाहिजे. मानसिक आरोग्य आणि जीवनाचा प्रश्न येतो तेव्हा लाजेला जागा नसावी', असं अनुष्काने ट्विट केलं होतं.
2019 मध्ये आलिया खूप चिंतेत होती. फिल्मफेअरशी बोलताना आलिया म्हणाली की, हे डिप्रेशन नव्हते, पण मला खूप लो फिल होत होतं. मला सतत वाटायचं की मी थकलीये किंवा कोणाला भेटू शकत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती स्विकारणं. तुम्ही बरे आहात असं म्हणू नका. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर बरं वाटत नाही हे सांगणं आवश्यक आहे.
प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरही त्याच्या मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने बोलला आहे. एका मुलाखतीत करणने सांगितले होते की, 'मी एका मीटिंगमध्ये होतो आणि मला कळले की मला हृदयविकाराचा झटका येणार आहे, मी ताबडतोब डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा मला कळले की मी तणावग्रस्त आहे, माझ्यात काहीच उरले नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर तो एकटाच राहिला, तो एकटा असताना त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी त्याला अस्वस्थ करू लागल्या.