अभिनेते मिलिंद सोमण वयाच्या पन्नाशीनंतरसुद्धा तितकेच फिट अँड हँडसम आहेत. त्यांचा फिटनेस पाहून तरुणसुद्धा थक्क होतात.
|
1/ 8
अभिनेते मिलिंद सोमण वयाच्या पन्नाशीनंतरसुद्धा तितकेच फिट अँड हँडसम आहेत. त्यांचा फिटनेस पाहून तरुणसुद्धा थक्क होतात. परंतु यासाठी ते अतिशय मेहनत घेतात. त्यांना असं वाटतं सर्वांनीच जगण्यासाठी हा कानमंत्र अवलंबला पाहिजे.
2/ 8
नुकतंच मिलिंद सोमण यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टची चर्चा सर्वत्र होत आहे. यामध्ये त्यांनी काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
3/ 8
मिलिंद सोमण यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये काही मुले पुशअप्स करताना दिसून येत आहेत. खरं तर हे त्यांचे चाहते आहेत.
4/ 8
मिलिंद सोमण यांनी पोस्ट लिहीत सांगितलं आहे, 'आळशी लढा, सेल्फी युगा साठी. मिलिंद यांनी म्हटलं आहे. माझा अनेक वर्षांपासून नियम आहे जो मुलगी पुशअप्स करत नाही मी त्याच्यासोबत सेल्फी घेत नाही.
5/ 8
मुलासाठी 20 पुशअप्स आणि मुलींसाठी 10 असा माझा नियम आहे. माझा मूळ उद्देश त्यांना सेल्फी काढण्यापासून परावृत करणे हाच होता. परंतु विशेष म्हणजे हे सर्वजण आनंदाने पुशअप्सचं चॅलेंज घेत आहेत.
6/ 8
वयाच्या 80 व्या वर्षी जर हे चॅलेंज माझी आई पूर्ण करू शकत असेल तर ते कोणासाठीही सहज शक्य आहे, असं मला वाटतं.
7/ 8
जेव्हा तुम्ही हे करून पाहता तेव्हाच तुमच्या लक्षात येतं की हे तुम्ही करू शकता. त्यातून तुम्हाला आणखी चांगलं करण्याची ऊर्जा मिळते.एका नेटकऱ्याने त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे , मी दररोज 40 पुशअप्स काढेन परंतु तुम्ही आमच्या चिपळूणजवळील ४३ एकर शेताला भेट द्यायला हवी.
8/ 8
गर्भवती महिला, दुखापत झालेली व्यक्ती आणि घातलेली मुले यांच्यासाठी हा फिटनेस नियम अपवाद आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.