बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असते. मलायका अरोरा 49 वर्षांची झाली आहे पण ती तिच्या लूक आणि फिटनेसमुळे अनेकांचं लक्ष वेधत असते. नवीन अभिनेत्री आणि मॉडेल्सलाही मलायका बोल्डनेस आणि फिटनेसमध्ये मागे टाकते. मलायका सध्या तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमुळे चर्चेत आहे. वाढत्या वयासोबत मलायकाला अनेक प्रकारच्या भीतीचा सामना करावा लागत आहे, ज्याबद्दल तिने शो दरम्यान नोरा फतेहीला सांगितलं. मी देखील एक माणूस आहे त्यामुळे मलाही अनेकवेळा वाटतं की या गोष्टी करु शकते का? कोणीतरी तरुण, सुंदर, कदाचित अधिक प्रतिभावान आहे. जीवनात तुम्हाला या भीतीला दररोज सामोरे जावं लागतं. मलाकाचा शो आणि शोमधील प्रत्येक गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.