Bigg Boss 15 मध्ये 'अंगूरी भाभी' चा असणार समावेश? शुभांगी अत्रे ने केला खुलासा
'भाभीजी घरपर है' या मालिकेमुळे शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली आहे.
|
1/ 8
'भाभीजी घरपर है' ही विनोदी मालिका खुपचं लोकप्रिय आहे. तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्र खुपचं प्रसिद्ध आहे. त्यातीलचं एक म्हणजे अंगुरी भाभी होय. हे पात्र अभिनेत्री शुभांगी अत्रे साकारत आहे. शुभांगीला 'बिग बॉस 15' चं निमंत्रण मिळाल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
2/ 8
अंगुरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेला बिग बॉस 15 साठी विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. आत्ता बिग बॉसमध्ये का सहभागी होऊ शकत नाही याबद्दल शुभांगीने खुलासा केला आहे.
3/ 8
शुभांगीने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे, मला स्वतः सलमान सरांसोबत स्क्रीन शेयर करायची आहे. यामध्ये काही खोटं नाहीय. मात्र आपल्या मालिकेची जबबदारीसुद्धा मला माहिती आहे.
4/ 8
शुभांगीने म्हटलं आहे, मला माझ्या चाहत्यांना नाराज नाही करायचं. त्यामुळे मी ही मालिका सोडू शकत नाही. आणि म्हणूनच मी त्या घरामध्ये कैद होण्यास तयार नाहीय.
5/ 8
तसेच तिनं म्हटलं आहे, यावर्षीच नव्हे तर प्रत्येक वर्षी मला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारलं जातं. म्हणूनच मला आत्ता हा शो बघण्यात रस निर्माण झाला आहे.
6/ 8
शुभांगीने म्हटलं आहे, मी हा शो फॉलो करते. मात्र याचा अर्थ असा नाही की मी यामध्ये सहभागी होणार आहे.
7/ 8
तसेच ती म्हणते, या शोमध्ये एक स्पर्धक म्हणून कसं वाटत मला नाही माहिती, पण माझं मन खुपचं हळव आहे. जेव्हा या घरात कारण नसतानासुद्धा भांडण होतं ते पाहून मला नैराश्य आल्यासारखं वाटतं. कारण मी असं नाही करू शकत. मात्र मोकळ्या वेळेत मी हा शो बघते.
8/ 8
लहानपणापासून अभिनेत्री व्हायचं स्वप्न असणाऱ्या शुभांगीच हे स्वप्न लग्नानंतर पूर्ण झालं होतं.