advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हे 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट उडवतील थरकाप; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर, आयुष्यात एकदा तरी पाहाच

हे 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट उडवतील थरकाप; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर, आयुष्यात एकदा तरी पाहाच

5 Best Suspense Thriller Movies All Time :तुम्हाला थ्रिलर असं काही पाहायची इच्छा असेल. तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. या लिस्टमध्ये असे काही सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आहेत जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

01
बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त सिनेमे हे लव्हस्टोरीभोवती फिरणारे असतात. किंवा कथा काहीही असली तरी त्यामध्ये लव्ह स्टोरी सर्रास पाहायला मिळते. परंतु तुम्हाला थ्रिलर असं काही पाहायची इच्छा असेल. तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. या लिस्टमध्ये असे काही सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आहेत जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

02
मेमरीज ऑफ मर्डर- गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवरील 'स्क्विड गेम' ही सीरिज जगभर पसंत केली गेली होती. यासोबतच कोरियन चित्रपटांनीही लोकांचं लक्ष वेधलं होतं. कोरियन दिग्दर्शक बोंग जून हो यांचा 'मेमरीज ऑफ मर्डर' हा चित्रपट एका सिरीयल किलरची कथा आहे. आतापर्यंतच्या इतिहासात या चित्रपटाची गणना सिरियल किलर्सच्या कथांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकांवर केली जाते.या थ्रिलर चित्रपटाची कथा अगदी खरी आहे. कोरियातील एका गावात मुली अचानक बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. त्या ठिकाणी एक खुनी राहत असतो जो गावातील मुलींना उचलून नेतो आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलींचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत सोडून देतो. या चित्रपटाची कथा सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेली आहे. हा चित्रपट पाहून तुमचंही रक्त खवळून उठेल. या चित्रपटाला IMDb वर 1 लाख 91 हजार लोकांनी 8.1 रेटिंग देखील दिलं आहे.

03
ज्युलियाज आइज: स्पॅनिश दिग्दर्शक गुइलम मोरालेस यांचा ज्युलियाज आइज हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. सस्पेन्स हॉररने भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाची कथा 2 बहिणींवर आधारित आहे. त्यापैकी एका बहिणीचा गूढ मृत्यू होतो आणि तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून येतो. तर दुसरीकडे, दुसरी बहीण एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असते. ज्यामध्ये तिची दृष्टी हळूहळू जायला लागते. तरीही ती मुलगी तिच्या बहिणीच्या मृत्यूचं रहस्य शोधू लागते. चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

04
विन्सिड: भारतीय ज्येष्ठ चित्रपट निर्माते सृजित मुखर्जी यांच्या 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'विन्सिड' या चित्रपटानेही जागतिक स्तरावर खूप प्रसिद्धी मिळवली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर आहे. ज्यामध्ये एक मेकअप आर्टिस्ट त्याच्या उद्धट आणि घमंडी स्वभावामुळे काम करत नसतो. यादरम्यान तो एका अशा व्यक्तीला भेटतो जो त्याला मेकअप करण्यासाठी हवे तितके पैसे द्यायला तयार असतो. ती व्यक्ती एक सीरियल किलर असते, ज्याचा खरा चेहरा फक्त मेकअप आर्टिस्टच ओळखत असतो. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची कथाही मन हेलावून टाकते.

05
द ऑदर्स: हा सिनेमा 2001 साली स्पॅनिश भाषेत प्रदर्शित झाला होता. 'द ऑदर्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक अलेक्झांड्रो अमेनाबार हे आहेत. या सस्पेन्स हॉरर चित्रपटाची कथा एका अशा कुटुंबाभोवती फिरते जे नुकतेच नवीन घरात शिफ्ट झालेले असतात. या घरात येताच घरातील मुलांना इतर काही मुले दिसायला लागतात. या मुलांना ते कुटुंब भूत समजत असतात. या चित्रपटाची था अतिशय गंभीर आणि सुन्न करणारी आहे.

06
द इनव्हिजिबल मॅन: ''द इनव्हिजिबल मॅन'' हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक ली व्हॅनेल हे आहेत. या सस्पेन्स थ्रिलरमध्ये पती-पत्नीची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये महिलेच्या पतीचा मृत्यू होतो. काही दिवसांनी पत्नीला पतीवर संशय यायला लागतो. आणि ती याबाबत एक थिअरी देते. ज्यामध्ये तिच्या पतीने आत्महत्या केलेली नसून माणसाला अदृश्य करणारा सूट बनवला असल्याचं समोर येत. आणि आता तो अदृश्य होऊन आयुष्यभर पत्नीचा छळ करणार असल्याचं दाखविण्यात आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त सिनेमे हे लव्हस्टोरीभोवती फिरणारे असतात. किंवा कथा काहीही असली तरी त्यामध्ये लव्ह स्टोरी सर्रास पाहायला मिळते. परंतु तुम्हाला थ्रिलर असं काही पाहायची इच्छा असेल. तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. या लिस्टमध्ये असे काही सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आहेत जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

    MORE
    GALLERIES