बॉलिवूडमधील अत्यंत गुणी आणि गोंडस अभिनेत्री म्हणून अभिनेत्री श्रद्धा कपूरला ओळखलं जातं. श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात.
नुकतंच श्रद्धा कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री फुल्ल फेस्टिव्हल मूडमध्ये दिसून येत आहे.
सध्या देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. सर्व सामान्य लोकांपासून सेलेब्रेटींपर्यंत सर्वांमध्येच दिवाळीबाबत उत्सुकता दिसून येत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षात कोरोना महामारीमुळे प्रत्येक सण फारच नियम आणि अटींसोबत साजरे करण्यात आले होते. यंदा मात्र असं काही नाहीय. त्यामुळे लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
दरम्यान बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक दिवाळी पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये जवळजवळ सर्वच कलाकार सहभागी होत आहेत. परंतु श्रद्धा अशा पार्ट्यांमध्ये फारच क्वचित दिसून येते.
श्रद्धा कपूरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ऑरेंज कलरच्या लेहेंग्यामध्ये फारच सुंदर दिसत आहे. कपाळावर टिकली आणि गळ्यात चोकर तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडत आहेत.
श्रद्धा कपूरने आपले ट्रॅडिशनल फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, 'दिवाळी वर्षातून ३ वेळा का असू नये?' यावर नेटकरी विविध कमेंट्स करत आहेत.
श्रद्धा कपूरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. श्रद्धाला फॉलो करणाऱ्या तरुणींसाठी यंदाच्या दिवाळीत हा लुक कॅरी करता येईल.