देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्व सामान्य लोकांपासून बॉलिवूड सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण दिवाळी सेलेब्रेशनमध्ये मग्न आहेत.
यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरसुद्धा मागे नाहीय. श्रद्धा कपूरने नुकतंच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या दिवाळी उत्सवाचे फोटो शेअर केले आहेत.
श्रद्धा कपूर यंदा कोणत्याही दिवाळी पार्टीत दिसून आली नाही. यंदा अभिनेत्रीने आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
श्रद्धा कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र दिसून येत आहे. यामध्ये श्रद्धाचे बाबा अभिनेते शक्ती कपूर आणि मावशी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेसुद्धा दिसून येत आहेत.
श्रद्धा कपूरचे सर्व कुटुंबीय अगदी पारंपरिक पद्धतीने तयार झाले आहेत. या दिवाळी लूकमध्ये सगळेच फार सुंदर दिसत आहेत.
श्रद्धा कपूरने काल आपल्या घरी झालेल्या लक्ष्मीपूजनाची एक झलकही शेअर केली आहे. अभिनेत्रीने अगदी पारंपरिक दिवाळी साजरी केली आहे.
इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने डाएट वगैरे सगळं काही बाजूला ठेवून घरातील लाडू, चिवडा, करंज्या अशा झक्कास फराळाचा आनंद घेतला आहे.