बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिया मिर्झाचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्रीने खूप संघर्ष केला सोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यही सोपं नव्हतं.
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अभिनेत्रीने खूप संघर्ष केला सोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यही सोपं नव्हतं.
दिया 4 वर्षाची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीच्या आईनं हैदराबादमध्ये राहणाऱ्या अहमद मिर्झासोबत पुन्हा लग्न केलं. दीपा यांच्या दुसऱ्या नवऱ्यानं दियाला मनापासून स्वीकारले आणि तिचा सांभाळ केला.
सावत्र वडील अहमद मिर्झासोबत असलेल्या खास नात्यामुळे दियाने तिचं आडनाव मिर्झा लावायला सुरुवात केली.
अभिनेत्री दिया मिर्झाने वयाच्या 16 व्या वर्षी मल्टीमीडिया कंपनीत काम करायला सुरुवात केली आणि वयाच्या 18 व्या वर्षी दिया मिर्झाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावला होता.
दियाने 'रहना है तेरे दिल में'मधून बॉलिवूड पदार्पण केलं आणि त्यांनंतर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.