बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करणं प्रचंड आवडतं. 'पठाण'च्या तुफान यशानंतर आता दीपिका पादुकोण थेट भूटानच्या ट्रीपवर गेली आहे. अभिनेत्रीने निसर्गरम्य वातावरणात वावरतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीने काही चिमुकल्यांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा नो मेकअप लूक स्पष्ट दिसून येत आहे. मात्र अभिनेत्रीच्या डोळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी अभिनेत्रीचा डावा डोळा सुजल्याचं आणि बारीक झाल्याचं म्हटलं आहे. चाहत्यांनी चिंता व्यक्त करत तुझ्या डोळ्याला नेमकं काय झालंय असा प्रश्न विचारला आहे. तर भूटान ट्रिपचे हे फोटो पाहून अनेकांनी तू भूटानची नवी ब्रँड अँबॅसिडर झालीस का असा सवाल केला आहे. दीपिकाच्या या फोटोंमध्ये रणवीर मात्र दिसत नाहीय याबाबतही चाहते प्रश्न विचारत आहेत.