दयानंदला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती. तो शॉट पुट आणि डिस्कस थ्रोचा खेळाडू होता आणि यात त्याची कामगिरी चांगली होती.
क्रीडा जगतापासून दूर राहिल्यानंतर त्याने थिएटर आणि कमर्शियलच्या दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर 1998 मध्ये त्यांनी 'सीआयडी' या टीव्ही शोसाठी ऑडिशन दिले आणि निवड झाली.
सीआयडी शोमध्ये त्याला 'इन्स्पेक्टर दया' ही व्यक्तिरेखा देण्यात आली होती. 'इन्स्पेक्टर दया' ही व्यक्तिरेखा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी ठरली आणि तो घराघरात पोहचला.