'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून श्रेया बुगडे घराघरात लोकप्रिय झाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे.
श्रेयाच्या व्यावसायिक आयुष्याबत सर्वांनाच बऱ्यापैकी माहिती आहे. मात्र अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबाबत आणि लव्हलाईफबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. '
या दोघांची पहिली भेट एका मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यावेळी निखिलला पाहताच क्षणी श्रेया आवडली होती.
परंतु श्रेयाकडून असं अजिबात नव्हतं. निखिल सेटवर सतत श्रेयासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करतहोता. अशातच या दोघांमध्ये एका कारणावरुन खटकलं. दोघांचं थोडंफार बोलणं होतं तेही बंद झालं.
पुढे काही दिवसांनी एका मालिकेच्या टायटलवर निर्माता म्हणून निखिलचं नाव पहिल्यानंतर श्रेयाने त्याला शुभेच्छा दिल्या. इथून पुन्हा त्यांचं बोलणं सुरु झालं.
याकाळात निखिलच्या घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होती. आणि योग्य वेळ साधत निखिलने श्रेयाला प्रपोज केलं. आणि श्रेयानेसुद्धा त्याला होकार दिला.