बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला. या खास दिवशी, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर खूप गोंडस फोटो शेअर केले आहेत.
बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने पत्नी नताशा दलालसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दोघांनीही या खास दिवशी ट्विनिंग केल्याचं दिसत आहे.
शिल्पा शेट्टीनंही तिच्या घरी करवा चौथची पूजा ठेवली होती. यामध्ये अनेक सेलिब्रेटिंनी हजेरी लावली. याशिवाय तिनं राज कुंद्रासोबतही फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने करवा चौथच्या दिवशी पती रोहनप्रीत सिंगसोबतचे रोमॅन्टिंग फोटो शेअर केले आहेत.
'कुंडली भाग्य' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या देखील तिचा पहिला करवा चौथ साजरा करत आहे. तिने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नौदल अधिकारी राहुल शर्माशी लग्न केले.
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलीकने करवा चौथच्या दिवशी तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हे जोडपे त्यांच्या टेरेसवर दिसत आहेत. फोटोंमध्ये रुबीनाने पर्पल कलरचा सूट घातला आहे, तर अभिनव शुक्लाने कुर्ता पायजमा घातला आहे.
अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांचाही हा पहिलाच सण आहे. दिशानं तिच्या इंस्टाग्रामवर राहुलसोबत फोटो शेअर केलेले पहायला मिळाले. दोघेही फोटोमध्ये कपल गोल्स देताना दिसत आहे.
मौनी अनेकदा तिच्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. मग आता करवा चौथला तर तिनं ग्लॅमरस लुक करत पतीसोबत फोटो शेअर केले आहेत.