बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान कार आणि घरांच्या बातम्या तुम्ही नेहमीच वाचत असाल. पण तुम्हाला माहित आहे का की, अनेक बॉलिवूड स्टार्सकडे स्वतःचे खाजगी जेट देखील आहेत.
या यादीत बॉलिवूडच्या अभिनेत्रीसुद्धा मागे नाहीत. यामध्ये प्रियांका चोप्रापासून शिल्पा शेट्टीच्याही नावाचा समावेश आहे.
शिल्पा शेट्टी: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये बिझनेसमन राजकुंद्रासोबत लग्न केलं आहे. शिल्पा शेट्टीच्या रॉयल लाईफस्टाईलची नेहमीच चर्चा होते. शिल्पा शेट्टीकडे मर्सिडीज-एएमजी जी६३, एसयूव्हीसह अनेक लक्झरी कारचं कलेक्शन आहे. यासोबतच शिल्पा शेट्टीकडे स्वतःचं खासगी जेटही आहे. शिल्पा अनेकवेळा या जेटमधून प्रवास करताना दिसली आहे.
अक्षय कुमार-बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचादेखील या यादीत समावेश आहे. अक्षयकडे अनेक लग्झरी कारचं मोठं कलेक्शन आहे. सोबतच अभिनेत्याकडे एक स्वतःच जेट विमानसुद्धा आहे.
सलमान खान- बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सर्वात श्रीमंत सेलेब्रेटींपैकी एक आहे. तो मोठ्या प्रमाणात गरजुंना मदतही करत असतो. अभिनेत्याच्या लाईफस्टाईलची सर्वांनाच उत्सुकता असते. सलमान खानकडेसुद्धा खाजगी जेट आहे.
सैफ अली खान- सैफ अली खान हा नवाब कुटुंबातील मुलगा आहे. मुंबईच नव्हे तर भोपाळमध्येही अभिनेत्याची कौटूंबिक संपत्ती आहे. त्याच्याकडे कोट्यावधींच्या कार आहेत. मात्र तरीदेखील अभिनेत्याकडे एक खाजगी जेटसुद्धा आहे.
अनिल कपूर- दिग्गज अभिनेते अनिल कपूरसुद्धा महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत. शिवाय त्यांच्याकडेही खाजगी जेट आहे.
प्रियांका चोप्रा- बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या प्रियांकाकडेही स्वतःच आलिशान जेट आहे.