प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. मग सामान्य व्यक्ती असो वा बॉलिवूड स्टार. सिनेमांमध्ये कोणताही स्टंट न घाबरता पूर्ण करणाऱ्या या बॉलिवूड स्टार्स कोणत्या गोष्टीला घाबरतात हे वाचल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही...
बाजीराव मस्तानीमध्ये युद्ध करताना न घाबरणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा एका गोष्टीला घाबरते. दीपिकाला तणावाची भीती वाटते. ती एकदा तणावाची शिकार झाली असल्यानं ती नेहमी तणावापासून दूर राहते. तसंच ती असं कोणतही काम करत नाही ज्यामुळे तणाव येऊन तिच्या कामावर त्याचा परिणाम होईल.
फक्त मुलींना झुरळ आणि किड्यांची भीती वाटते असं नाही अभिनेता रणबीर कपूरलाही या दोन्हींची खूप भीती वाटते.
बॉलिवूडची 'क्यूट गर्ल' आलिया भटला काळोखाची भिती वाटते. त्यामुळे रात्री झोपताना ती लाइट्स सोबत रुमच्या खिडक्यासुद्धा उघड्या ठेवते.
तुम्ही कधी ऐकलं आहे का की, कुणाला पंख्याची भीती वाटते. सिनेमांमध्ये बिनधास्त स्टंट सीन देणाऱ्या अर्जुन कपूरला सीलिंग फॅनची भीती वाटते. त्यामुळे त्याच्या रुममध्ये एकही फॅन नसतो.
अभिनेत्री सोनम कपूरला एलिवेटरवर चढण्याची भीती वाटते त्यामुळे ती नेहमी एलिवेटर ऐवजी पायऱ्यांचा वापर करते.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही एक भीती सतावते. ती म्हणजे डोळ्यात लेन्स लावण्याची. 'सत्ते पे सत्ता'च्या शूटिंग दरम्यान अमिताभ यांच्या डोळ्यात लेन्स अडकली होती तेव्हा पासून ते कोणत्याच सिनेमात काम करताना लेन्स वापरत नाहीत.
बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानला घोड्यावर बसण्याची भीती वाटते. त्यामुळे तो कोणत्याच सिनेमात हॉर्स रायडींग करताना दिसत नाही. करण अर्जुन या सिनेमात तो एकदाच घोड्यावर बसला होता. पण त्यावेळी त्याच्या पाठीला दुखापत झाली होती.
आलिया प्रमाणं बॉलिवूड बेबी डॉल सनी लिओनीला सुद्धा काळोखाची भीती वाटते. ती काळोखात एक मिनिटही थांबू शकत नाही. त्यामुळे ती झोपताना तिच्या रुममध्ये नेहमी हलकासा उजेड नेहमीच ठेवते.