मुंबई - बॉलीवूडचा खिलाड़ी अक्षय कुमार (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं मुंबईत चित्रिकरण सुरू असून त्याच अक्षय व्यस्त आहे. या चित्रपटाचं शुटिंग सुरू असतानाच त्यात अक्षय कुमार जखमी झाला होता अशी माहिती आता बाहेर आलीय. शुटिंग सुरू असतानाच एक स्टंट करताना त्याच्या हाताला मोठा मार बसला. मात्र जखमी झाल्यानंतरही त्याने थोडा आराम करून पुन्ही शुटींग सुरू केलं. डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता मात्र अक्षयने तो ऐकला नाही. हाताला पट्टी बांधून तो काम करतच राहिला त्यामुळे सगळ्याच कलाकारांना आश्चर्य वाटलं. या चित्रपटात अवघड स्टंट असून ते सगळेच तो स्वत: करणार आहे. यात कटरिना कॅफ असून त्यात तो तिच्यासोबत रोमँटीक भूमिकेत असणार आहे.