साऊथ स्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत काही दिवसांपूर्वीच त्यांच्या विभक्त झाल्याची घोषणा करून चर्चेत आले होते. सर्वाधिक हाय-प्रोफाइल ब्रेकअप्सच्या यादीत सामील झालेल्या सेलिब्रिटींपैकी ते एक आहेत. आता सोहेल खान आणि सीमा खान यांनी तब्बल 24 वर्षांचा वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.आज आपण अशाच आणखी काही जोडप्यांबद्दल जाणून घेणार आहोत. जे नुकतंच एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.
सोहेल खान आणि सीमा खान : काल सोहेल खान आणि सीमा यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या जोडप्याच्या लग्नाला 24 वर्षे झाली असून त्यांना दोन मुले आहेत. सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल आणि सीमा, जे 'द फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज' मध्ये दिसले होते ते शुक्रवारी मुंबईतील फॅमिली कोर्टातून बाहेर पडताना दिसले त्यामुळे सर्वानांच धक्का बसला आहे.
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल : सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या ब्रेकअपच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. माजी मिस युनिव्हर्सने काही दिवसांपूर्वी या बातमीला दुजोरा देत आपलं ब्रेकअप झाल्याचं मान्य केलं होतं. तसेच इन्स्टा पोस्टद्वारे अधिकृत घोषणा करत आपण आता फक्त चांगले मित्र असल्याचं सांगितलं होतं.