बॉलिवूड सोडण्याआधी असा होता सना खानचा लुक, व्हायरल होत आहेत BOLD PHOTOS
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सना खानने तिच्या सोशल मीडियावर 'हिजाब' मधील फोटो शेअर केले आहेत. एक काळ असा होता की ती तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत होती. मात्र आता तिचा लुक पूर्णपणे बदलला आहे.


बिग बॉस-6 (Bigg Boss 6) ची स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) हिने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तिने तिचे जुने फोटो देखील डिलीट केले आहेत आता केवळ तिचे 'हिजाब' परिधान केलेले फोटो इन्स्टाग्रामवर दिसत आहेत. (फोटो सौ.-instagram/@sanakhaan21)


सनाने शेअर केलेल्या मेसेजमध्ये असे करण्याचे कारण धर्म सांगितले आहे. तिच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे म्हणत अभिनेत्रीने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. (फोटो सौ.-instagram/@sanakhaan21)


सना खान (Sana Khan)ने असं म्हटलं आहे की, 'माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण. अल्लाह माझ्या या प्रवासात मला करेल आणि रस्ता दाखवेल.' तिने एक नोट या पोस्टमध्ये शेअर केली आहे. . (फोटो सौ.-instagram/@sanakhaan21)


या नोटमध्ये सना खानने असे म्हटले आहे की, 'बंधू आणि भगिनींनो, मी आता माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपले आहे आणि याबाबत मी आता तुमच्याशी बोलत आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. या काळात मला किर्ती, इज्जत आणि संपत्ती मिळाली. माझ्या चाहत्यांकडून हे सर्व मिळाले, ज्यासाठी मी कृतकृत्य आहे.' (फोटो सौ.-instagram/@sanakhaan21)


याआधी झायरा वसीम या अभिनेत्रीने देखील इस्लामसाठी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता सना खानच्या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (फोटो सौ.-instagram/@sanakhaan21)


सनाने पोस्ट केलेल्या नोटमध्ये ती Showbizz (फिल्म इंडस्ट्री) सोडत असल्याचे म्हटले आहे. (फोटो सौ.-instagram/@sanakhaan21)


सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी तिने तिचा बॉयफ्रेंड मेलविन लुईसवर अनेक आरोप केले होते. त्याच्या बद्दल तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. आता पुन्हा एकदा अभियन क्षेत्र सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौ.-instagram/@sanakhaan21)