Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ARJUN KAPOOR SHARED BEFORE AFTER PHOTOS OF HIS 15 MONTH FITNESS JOURNEY MHJB

6 पॅक अ‍ॅब्स कमावले अर्जुनने पण कौतुक मात्र मलायकाचं! अभिनेत्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चाहते थक्क

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या दीड वर्षांपासून त्याच्या फिटनेस संदर्भात अधिकच गंभीर आहे. त्याने गेल्या 15 महिन्यात अधिक तंदुरुस्त शरीर कमावले आहे, त्याची फिट बॉडी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अभिनेत्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुनने त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एकावर फेब्रुवारी 2021 तर एकावर मे 2022 असे लिहिले आहे. यामध्ये तो शर्टलेस लुकमध्ये असून फेब्रुवारी 2021 ते मे 2022 या काळात त्याच्यामध्ये बराच बदल झाल्याचे दिसून येते आहे.

  • |