सध्या यामी गौतम आपली सहकलाकार निम्रत कौरसोबत तिच्या आगामी 'दसवीं' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामी सध्या निम्रत आणि चित्रपटाच्या टीमसोबत आग्रा दौऱ्यावर आहे. दरम्यान ती चित्रपटाच्या टीमसोबत जगप्रसिद्ध वास्तू ताजमहाल पाहण्यासाठी गेली होती. यामीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
यावेळी यामी गौतमने फ्लोअर लेन्थ गोल्डन ड्रेस परिधान केला होता. यासोबत तिने सनग्लासेससुद्धा लावले होते.
चाहते तिला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. एकाने कमेंट देत म्हटलं आहे, 'तू तर ताजमहालपेक्षा सुंदर आहेस'.