बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सोमवारी विमानतळावर दिसली. जिथे तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले. दीपिका पांढऱ्या रंगाच्या सॉक्समध्ये ओव्हरसाईज ब्लू प्रिंटेड डेनिम जॅकेट आणि हलक्या निळ्या हील्समध्ये दिसली. दीपिकाचे हे फोटो समोर येताच सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या फॅशन सेन्सवरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली. दीपिकाचे डेनिम जॅकेट लोकांना फारसे आवडले नाही. पण त्याची किंमत जाणून तुम्ही थक्क व्हाल.