बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. हे दोघेही नेहमीच कपल गोल देत असतात.
यामध्ये ती पती विराट कोहलीसोबत ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्रीने पिंक कलरचा सूट तर विराटने ब्ल्यू कलरची शेरवानी परिधान केली आहे.
या फोटोंमध्ये हे दोघेही फारच सुंदर आणि उत्साहात दिसून येत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
अनुष्का आणि विराटने हा लुक क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमणच्या वेडिंग फंक्शन्ससाठी केला होता. सोबतच अभिनेत्रीने एक कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे, ''बबल मध्ये लग्न कार्य! आता मला वाटते की मी शक्यतो प्रत्येक फंक्शन आणि सण एका बबलमध्ये पाहिले आणि साजरे केले! #बबललाइफ''
अनुष्का आणि विराट दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात.