बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 19 नोव्हेंबर 1975 रोजी जन्मलेली अभिनेत्री सुष्मिता सेन आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिच्या लव्ह लाईफविषयी जाणून घेऊया.
सुष्मिताचे नाव आत्तापर्यंत अनेकांशी जोडले गेले आहे. सुष्मिता सेनचे नाव पहिल्यांदा दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले होते. 1996 मध्ये आलेल्या 'दस्तक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यावेळी सुष्मिता 2०-21 वर्षांची होती आणि दोघांची जवळीक वाढू लागली. पण विक्रम विवाहित होता आणि हे नाते फार काळ टिकले नाही.
सुष्मिता सेनचे नाव देखील रणदीप हुड्डासोबत जोडले गेले होते आणि दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. 'कर्म और होली' दरम्यान दोघांची जवळीक वाढली होती आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्याही मीडियामध्ये खूप चर्चेत होत्या. दोघांनी एकमेकांना तीन वर्षे डेट केलं.
सुष्मिताचे नाव सेलिब्रिटी मॅनेजर बंटी सचदेवसोबतही जोडले गेले होते आणि दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. बंटी त्यावेळी सुष्मिताचा मॅनेजर होता आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.
'दुल्हा मिल गया' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक मुदस्सर अजीजसोबत सुष्मिताची जवळीक वाढू लागली. असे म्हटले जाते की, सुष्मिता मुदस्सरच्या प्रेमात इतकी पागल होती की ती त्याच्या घरी राहू लागली. मात्र काही काळानंतर दोघेही वेगळे झाले.
पाकिस्तानचा प्रसिद्ध खेळाडू वसीम अक्रमसोबत सुष्मिताच्या अफेअरच्या होत्या. एका टीव्ही शोदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. पण त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीही बोलले नाही आणि ते स्वीकारले नाही.
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकत्र राहत होते आणि सुष्मिताच्या मुलींसोबत रोहमनचे बॉन्डिंगही चांगले आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षाच्या अखेरीस सुष्मिताने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या ब्रेकअपची घोषणा केली. मात्र ते अजूनही चांगले मित्र आहेत.
या यादीत नुकतेच ललित मोदींचेही नाव जोडले गेले. ललित मोदींच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्या लग्नाच्या बातम्यांच्या चर्चांना उधाण आले होते. यामुळे ललित आणि सुष्मिताला अनेक ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सुष्मिताने या नात्यावर अधकृतरित्या काहीही उघडपणे सांगितले नाही.