बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या धाकट्या लेकीनं नुकताच बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत लग्न केलं आहे. हे दोघे तब्बल 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
करण आणि रिया कपूरच्या लग्नाचे फोटो सध्या चर्चेत आहेत. या दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपलं लग्न केलं आहे.
या दोघांनी सोशल मीडियावरसुद्धा आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी हे लग्न केलं आहे.
लग्नानंतर रियाने सोशल मीडियावर एक मजेशीर खुलासा केला आहे. रियाने म्हटलं आहे, की 'मला पळून जाऊन करणशी लग्न करायचं होतं'.
तसेच रियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, 'मला माझ्या लिविंग रूममध्ये लग्न करायचं होतं'. हे सर्व शक्य करण्यासाठी सर्वांचं आभार'. असंही तिनं म्हटलं आहे.
रिया आणि करणला सुरुवातीपासूनचं अगदी सध्या पद्धतीने आपल्या काही खास लोकांसोबत आणि कुटुंबाच्या उपस्थित हे लग्न करायचं होतं.
रिया आणि करणची पहिली भेट 'आयशा' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हे दोघेही तब्बल 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.