बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलपैकी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते त्यांच्या व्हेकेशन ट्रीपमुळे चर्चेत आहेत
रणबीर आणि आलिया सार्वजनिक ठिकाणी देखील एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. आलियाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत. मात्र कॅप्शनमध्ये तिने रणबीरचं कौतुक केलं आहे
आलियाचे हे नो मेकअप आणि नो फिल्टर फोटो खूपच गोड दिसत आहेत. हे फोटो रणबीरने काढल्याचं तिनं म्हटलं आहे
'माझ्या बॉयफ्रेंडचे फोटोग्रॅफी स्कील्स दाखवतेय...' असं कॅप्शन आलियाने हे फोटो शेअर करताना दिलं आहे. नक्कीच रणबीरने क्लिक केल्यामुळे आलियासाठी हे फोटो खास आहेत.
याआधी देखील आलियाने रणबीरचे आणि तिचे काही क्यू़ट फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
मीडिया अहवालानुसार आलिया भट्ट नवीन वर्षाच्या सुरुवातीला बॉयफ्रेंड रणबीर कपूरसह मसाई मारा, केनियामध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गेली आहे
या फोटोंमध्ये रणबीरचा लुक अगदी सर्वांचा लाडका सिनेमा 'ये जवानी हैं दिवानी..' मधील कबीर अर्थात बनीसारखा दिसत होता