

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ( Rakul Preet Singh) आज 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 1990 साली दिल्लीमध्ये झाला होता. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त रकुल प्रीत सिंह ( Rakul Preet Singh) तमिळ, तेलूगू आणि कन्नड सिनेमात देखील सक्रीय आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये रकुलची मोठी फॅन फॉलोइंग आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/रकुल प्रीत सिंह)


सोशल मीडियावर रकुल नेहमी सक्रीय असते. ती नेहमी तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/रकुल प्रीत सिंह)


रकुलने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/रकुल प्रीत सिंह)


रकुलने आतापर्यंत पँटालून फेमिना, मिस फ्रेश फेस, फेमिना मिस टॅलेंटेड, फेमिना मिस ब्यूटीफुल, मिस ब्यूटीफुल स्माइल आणि मिस ब्यूटीफुल आईज या सौंदर्य स्पर्धा तिने जिंकल्या आहेत (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/रकुल प्रीत सिंह)


रकुलने बॉलिवूडमध्ये दिव्या कुमारच्या 'यारियाँ' सिनेमातून एंट्री केली होती. यामध्ये तिची आणि हिंमाशू कोहलीची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/रकुल प्रीत सिंह)


रकुल एक पंजाबी परिवारातील असूनही तिने दक्षिणेत फॅन फॉलोइंग कमावले आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/रकुल प्रीत सिंह)


खूप कमी लोकांना माहिती आहे की, रकुल अभिनयाव्यतिरिक्त एक गोल्फ प्लेअर देखील आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/रकुल प्रीत सिंह)


काही दिवसांपूर्वी रकुलचे नाव ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आले होते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/रकुल प्रीत सिंह)