बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. बिपाशा आणि पती-अभिनेता करण सिंह ग्रोव्हर पहिल्यांदाच आईबाबा बनणार आहेत.
2/ 8
आपल्या आयुष्यातील या नव्या इनिंगसाठी हे जोडपं खूपच उत्सुक आहे. बिपाशा सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपल्या प्रेग्नेंसी काळातील विविध गोष्टी शेअर करत असते.
3/ 8
बिपाशाने नुकतंच इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या बेबी शॉवरची झलक दाखवली आहे.
4/ 8
बिपाशा मूळची बंगाली आहे. त्यामुळे हे बेबी शॉवर सेलिब्रेशन बंगाली चालीरितीनुसार करण्यात आलं आहे. बंगाली भाषेत, या विधीला 'साध' म्हणतात.
5/ 8
या कार्यक्रमामध्ये प्रेग्नेंट महिलेला तिच्या आवडीचे पदार्थ मोठ्या प्रेमाने खायला दिले जातात. या काळात तिचे जवळचे आणि आवडते लोक स्त्रीभोवती राहतात. जेणेकरून तिला सकारात्मक ऊर्जा मिळू शकेल.
6/ 8
बिपाशा बसूने एक व्हिडिओ पोस्ट करत बंगालीमध्ये लिहलंय, "माझं साध... धन्यवाद आई." बिपाशाची आई ममता बसू आणि सासू दीपा सिंह यांनी तिला ओवाळून कपाळावर टिळा लावल्याचं दिसून येत आहे.
7/ 8
या बेबीशॉवर सोहळ्यात बिपाशा बसू एकदम पारंपरिक अंदाजात दिसून आली. यावेळी तिने गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती.
8/ 8
बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.