बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई बनणार आहे. नुकतंच अभिनेत्रीनं सोशल मीडियावरुन ही गुड न्यूज दिली आहे.
करणने लिहलंय, 'ही वेळ सर्व भावनांचं मिश्रण आहे. नेमकं कसं सांगावं कळत नाहीय.माझ्या रक्तात आनंद आणि प्रेम उफाळून आल्यासारखं जाणवत आहे. सर्व काही नवीन परंतु तरीसुद्धा सर्व काही परिचित वाटत आहे.
माझ्या सर्वात मौल्यवान, सर्वात प्रिय स्वप्नांपैकी हे एक स्वप्न आहे. मी माझ्या भावना व्यक्त करु शकत नाहीय. कारण त्या भावना बाहेर आल्या की आनंदाचा विस्फोट होईल'.
बिपाशा आणि करण 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यांनतर त्यांनी एकेमकांना डेट केलं आणि नंतर लग्न केलं होतं.